Vadgaon Maval : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महालसीकरण अभियान; मावळ भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. 17 सप्टेंबर) मावळ तालुक्यात 40 ठिकाणी महालसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. मावळ तालुक्यासाठी 12 हजार लसकुप्या उपलब्ध झाल्या असून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मावळ पंचायत समितीचे सभापती, उपसभापती तसेच भारतीय जनता पार्टी मावळचे तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हे महालसीकरण अभियान व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर भारतीय जनता पार्टी मावळच्या वतीने सहकार्य करण्यासाठी गावस्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, महालसीकरण अभियानाच्या माध्यमातुन मोफत लस घेऊन कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी पुढे यावे, असे मावळवासीयांना विनंती करण्यात येत आहे.

आम्ही लस घेतली आहे व आम्ही सुरक्षित आहोत. तुम्ही पण लस, घ्या व तुम्ही सुरक्षित रहा, असेही आवाहन तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे, पंचायत समिती सभापती ज्योती शिंदे, उपसभापती दत्तात्रय शेवाळे यांच्याकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.