Bihar Election 2020 : एनडीएची मुसंडी, 123 जागांवर आघाडी तर महागठबंधन 112 जागांवर पुढे

एमपीसी न्यूज – संपूर्ण देशाचे लक्ष ज्या निवडणूकीच्या निकालाकडे लागले आहे अशा बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.
बिहार निवडणुकीचे सध्याच्या कलांनुसार, एनडीएची 123 जागांवर आघाडी तर महागठबंधन 112 जागांवर पुढे असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

मतमोजणीच्या सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मोजणी सुरू आहे. दरम्यान, पोस्टल बॅलेटच्या मोजणीमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने मोठी आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये बिहारमधील विविध भागात राष्ट्रीय जनता दल , काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआआघाडीच्या उमेदवारांना आघाडी मिळताना दिसत आहे.

हसनपूर विधानसभा मतदारसंघातून लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप पिछाडीवर, 10 वाजेपर्यंत ते आघाडीवर होते. तर इमामगंजमधून माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी देखील पिछाडीवर आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.