BijliNagar News: ‘भुयारी मार्गाचा वाढीव खर्च महापालिका अभियंते, सल्लागारांकडून वसूल करा’

मुदतीत काम न करणा-या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत बिजलीनगरकडून गुरूद्वाराकडे जाणा-या रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या भुयारीमार्गाच्या कामावर आतापर्यंत तब्बल साडेचार कोटीचा वाढीव खर्च झाला आहे. हा वाढीव खर्च महापालिका अभियंते, सल्लागार यांच्याकडून वसूल करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विनोद कांबळे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात कांबळे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत बिजलीनगरकडून गुरूद्वाराकडे जाणा-या रस्त्यावर भुयारीमार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, विद्युत वाहिनी, विद्युत जनित्र, जल:निसारण नलिका, पाणीपुरवठा नलिकांच्या अडथळ्यांमुळे अर्धवट स्थितीत असलेल्या या कामावर आतापर्यंत तब्बल साडेचार कोटीचा वाढीव खर्च झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराला दोन वर्षाच्या मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी 14 कोटी 25 हजार रुपयांची निविदा होती. असे असताना काम संथ गतीने व बेजबाबदारपणे केले जात आहे. कामास विलंब केल्यामुळे साडेचार कोटी रुपये वाढीव खर्च दिला आहे.

यामुळे पुलाचा खर्च 18 कोटी 66 लाख 74 हजार रुपयांवर गेला आहे. मुदतीत काम न केल्यामुळे ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी कांबळे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.