BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने दुस-या दुचाकीला समोरून धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 10) दुपारी साडेचारच्या सुमारास देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर हॉटेल लकी द इनवायटेड समोर घडली.

राम दत्तू इल्लाळे (वय 40) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी आकाश राम इल्लाळे (वय 19, रा. ताथवडे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम इल्लाळे बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरून त्यांच्या हिरो पॅशन (एम एच 14 / जी ई 0507) हिच्यावरून जात होते. ते हॉटेल लकी द इनवायटेड समोर आले असता त्यांच्या दुचाकीला समोरच्या बाजूने भरधाव वेगात आलेल्या एका मोपेड दुचाकीने (एम एच 14 ई जी 6560) जोरात धडक दिली. यामध्ये राम गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत त्यांचा मुलगा आकाश याने हिंजवडी पोलीस ठाण्यात मोपेड दुचाकीस्वारा विरोधात गुन्हा नोंदवला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like