Pimpri : भरधाव वेगात जाणारी बुलेट घसरली; बुलेटस्वार गंभीर

एमपीसी न्यूज – वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात जाणारी बुलेट चालकाचे नियंत्रण सुटल्याने घसरली. यामध्ये बुलेट चालकाला जबर दुखापत झाली. तसेच बुलेटचेही नुकसान झाले. ही घटना बुधवारी (दि. 12) रात्री साडेअकराच्या सुमारास टेल्को रोड, चिंचवड येथे घडली.

प्रितेश बाळासाहेब दौंडकर (वय 31, रा. श्रीकृष्ण इव्हेन्यू, स्पाईन रोड प्राधिकरण, चिंचवड) असे बुलेट चालक तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी चालकाविरोधात भारतीय दंड संहिता कलम 279 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रितेश बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास टेल्को रोडने बुलेटवरून (एम एच 14 / सी व्ही 5715) जात होता. रात्री रस्ता रिकामा असल्याने त्याच्या बुलेटचा वेग जास्त होता. संघवी केसरी कॉलेज समोर आला असता, त्याचे बुलेटवरील नियंत्रण सुटले आणि बुलेट रस्त्यावर घसरली. यामध्ये प्रितेश याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये त्याच्या बुलेटचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता भरधाव वेगात वाहन चालविल्या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 279 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.