Bhosari : कारची दुचाकीला धडक; तरुण गंभीर जखमी

Bike hit by car; young seriously injured.

एमपीसी न्यूज – एका कारने दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 10) दुपारी साडेबारा वाजता खंडेवस्ती चौक, एमआयडीसी भोसरी येथे घडली.

आफताब मजीद अन्सारी (रा. राजवाडा, इंद्रायणी नगर, भोसरी) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तबरेज वायजुलहक अन्सारी (वय 30) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी एम एच 50 / एन 5505 या क्रमांकाच्या कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेबारा वाजता जखमी आफताब एम एच 15 / डी झेड 8035 या दुचाकीवरून खंडेवस्तीकडून स्पाईन रोडकडे जात होता. त्यावेळी आरोपी कार चालकाने मागून येऊन आफताब याच्या दुचाकीला जोरात धडक दिली.

यामध्ये आफताब याच्या तोंडाला, डोक्याला, पायाला गंभीर दुखापत झाली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.