Mhalunge accident : वराळेत टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – वराळे येथे टेम्पो ने दुचाकीला धडक दिली (Mhalunge accident) ज्यामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. हि घटना शुक्रवारी (दि.24) वराळे येथे घडली आहे.

 

स्वप्नील अनाप असे मयत तरुणाचे नाव असून टेम्पो चालक धिरज जैनसींग ठोंगे (रा मामुर्डी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संकेत दत्तात्रय खटके (वय 25 रा.चाकण) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Today’s gold rate- सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी वाढ

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र स्वप्नील हे दुचाकीवरून जात होते. यावेळी स्वप्नील हा दुचाकी चालवत होता. यावेळी भरधाव आलेल्या टेम्पो ने फिर्यादीच्या (Mhalunge accident) गाडीला धडक दिली ज्यामध्ये स्वप्नील गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. यावरून टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.,

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.