Pimpri News : पिंपरी लिंक रोडवर घसरल्याने दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज – पिंपरी लिंक रोडवर 10 ते 15 दुचाकी घसरल्याने दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले तर बऱ्याच दुचाकी घसरण्यापासून थोडक्यात बचावल्या.

 

 

प्राथमिक माहितीनुसार ही घटना आता एका तासापूर्वी अंदाजे 7.40 वा च्या सुमारास  हॉटेल ईगल एगजेक्युटीव्हच्या समोर पिंपरी लिंक रोडवर एम्पायर इस्टेट उड्डाणपूलाखाली घडली आहे. रस्ता चिखलमय झाल्याने त्यावरून जाणाऱ्या 10 ते 15 दुचाकी घसरल्या.त्यामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या अनेक तरुण व वृद्ध नागरिकांना किरकोळ दुखापत झाली.

 

 

 

 

अधिक माहिती देताना, सामाजिक कार्यकर्ते स्वानंद राजपाठक म्हणाले, “पिंपरी लिंक रोडच्याकडेने पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने पाईपलाईन टाकण्यात येत आहे.10 फूट खोल खड्डे खोदून पाईप टाकण्यात आले. मातीने खड्डे भरण्यात आले पण डांबरीकरण केले नाही. संध्याकाळी पाऊस पडल्याने चिखल होऊन तो रस्त्यावर आल्यामुळे रस्त्यावरुन दुचाकी जाताना घसरल्या.10 ते 15 दुचाकी घसरल्या व त्यावरून जाणाऱ्या तरुणांना व ज्येष्ठ नागरिकांना किरकोळ दुखापत झाली. 20 हून अधिक  दुचाकी घसरण्यापासून थोडक्यात बचावल्या.”

 

राजपाठक म्हणाले की, “हे मी तेथून जाणाऱ्या काही जागरूक नागरिकांनी व जवळील भाटनगरमधील तरुणांनी पाहिले. आम्ही घसरून पडलेल्या लोकांना सावरण्यास मदत केली.आम्ही रस्त्यावर थांबवून येणाऱ्या दुचाकीस्वारांना

त्यांच्या दुचाकींचा वेग कमी करण्यास सांगत होते. त्यामुळे दुचाकी घसरणे बंद झाले. आम्ही तेथून जाणाऱ्या पोलिसांना थांबवले व त्यांना याबाबत सांगितले. पोलिसांनीसुद्धा आम्हाला तेथे वाहतूक नियंत्रण करण्यामध्ये मदत केली.”

मनपाच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे चिखल झाल्याने दुचाकी घसरल्या, असा स्थानिक नागरिकांनी आरोप केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.