Wakad News : रिक्षा व दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज – रिक्षा व दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील तरुण (Wakad News) जखमी झाला आहे. हा अपघात वाकड येथील अंडरपास येथे रविवारी (दि.5) हद्दीत घडला.
याप्रकरणी गणेश ज्ञानेश्वर माळी (वय 30 रा.रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र दुचाकीवरून जात असताना आरोपी त्याचा रिक्षा वेगात मागून घेऊन आला व त्याने ओव्हर टेक केले. (Wakad News) यात रिक्षाचा फिर्यादीच्या दुचाकीला धक्का दिला. यात फिर्यादी व त्यांचा मित्र दुचाकीसह खाली पडले. रिक्षाचालक तेथे न थांबता निघून गेला. यामध्ये फिर्यादी व त्यांचा मित्र जखमी झाले आहेत. वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.