Hinjawadi: हिंजवडी परिसरातून दुचाकी चोरीला

bike stolen from Hinjewadi area

एमपीसी न्यूज- हिंजवडी परिसरातून दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. ही घटना दि. 11 मे रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत 30 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश पांडुरंग ढाळे (वय 40, रा. पंचशील कॉलनी, जांबे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ढाळे यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची (एमएच 14 बीई 4433) ही दुचाकी 10 मे रोजी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. ही घटना 11 मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.