Alandi Crime News : आळंदी, तळेगावातून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – आळंदी, आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी शनिवारी (दि. 23) आळंदी आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गजानन रमेश इडोळे (वय 26, रा. केळगाव, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 50 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंग मधून चोरून नेली. हा प्रकार 18 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

संतोष दत्तू मोरे (वय 52, रा. तळेगाव स्टेशन, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी म्हाळसकरवाडी, तळेगाव स्टेशन येथील माउली ती सेंटरच्या पाठीमागून चोरून नेली. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. तळेगाव दाभाडे पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.