BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरीस

एमपीसी न्यूज – गृहनिर्माण सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. ही घटना चिंचवड येथे घडली.

भाग्यश्री अनिल शिंदे (वय 37, रा. देवधर सोसायटी, चिंचवड) यांनी शुक्रवारी (दि. 20) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 ते 15 सप्टेंबर दरम्यान फिर्यादी भाग्यश्री यांच्या घराच्या पार्किंगमधून बनावट चावीचा वापर करून अज्ञात चोरट्याने 25 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. पोलीस नाईक डामसे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3