Bhosari : मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा सराईत गजाआड

एमपीसी न्यूज – मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या एका सराईताला भोसरी, एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून 1 लाखांचा ऐवज जप्त केला असून 3 वाहन चोरीचे, एक जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. 

ओंकार ऊर्फ सोन्या विलास नागरे (वय 19, रा. इंद्रायणी रेसीडेन्सी, वहिलेनगर, डुडुळगाव), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

एमआयडीसी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी संशयावरून आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्याने दुचाकी व एक जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन स्प्लेंडर, 1 मोपेड व 3 मोबाईल असा 1 लाख 3 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.

ही कामगिरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय टेकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रावसाहेब बांबळे, अजय भोसले, रविंद्र तिटकारे, नवनाथ पोटे, किरण काटकर यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.