Pune : टँकर खाली येऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – मुंबई-बँगलोर महामार्गावर कात्रजकडे जाणा-या रस्त्यावर एका टँकर खाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.25) रात्री आठच्या सुमारास घडली.

सुनील गुलाब टिळेकर (रा. नांदेड सिटी), असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर आरोपी अछेलाल जयराम बिंद (वय 45, रा. उत्तरप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत टिळेकर हे शनिवारी रात्री मुंबई बँगलोर महामार्गावरून जात होते. यावेळी कात्रजकडे जाणा-या रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला टँकरची धडक बसल्याने ते रस्त्याच्या उजव्या बाजूस पडले. यावेळी टँकर त्याच्या अंगावरून गेल्याने टिळेकर यांचा जागेवरच मृत्यू झाला.

दरम्यान, पोलीस शिपायी अशोक जाधव यांनी याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन आरोपी अछेलाल याला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1