Sahakarnagar : पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – सहकारनगर येथे भरधाव वेगात येणा-या पीएमपीएमएल बसने एका मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.29) सायंकाळी चारच्या पद्मावती बसस्टॉप जवळ घडली. याप्रकरणी बस चालकाला अटक करण्यात आली आहे.  

राकेश सतीश पालांडे (वय 34, रा. बिबवेवाडी), असे मयत तरुणाचे नाव असून रामदास हनुमंत जगताप (वय 41, रा. कात्रज रोड, पुणे), असे अटक करण्यात आलेल्या बस चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार ए व्हि सोनवणे (सहकारनगर पोलीस ठाणे), यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामदास यांनी पीएमपीएमएल बस वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगात चालवून पद्मावती बसस्टॉप जवळ उजवीकडे येणा-या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार राकेश यांच्या छातीला दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.सहकारनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.