Dighi : मोबाईलवर बोलत थांबलेल्या महिलेचा मोबाईल दुचाकीस्वाराने हिसकावला

एमपीसी न्यूज -रस्त्याच्या बाजूला फोनवर बोलत थांबलेल्या महिलेचा मोबाईल फोन दुचाकीस्वाराने हिसकावून चोरून नेल्याची घटना चऱ्होली बुद्रुक येथे चऱ्होली फाट्याजवळ सार्वजनिक रस्त्यावर बुधवारी (दि. 15) सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडली. मोबाईल चोरून नेणाऱ्या दुचाकीस्वाराच्या विरोधात दिघी पोलीसांनी गुन्हा नोंदवला आहे.

अश्विनी जितेंद्र बावधनकर (वय 29, रा. चऱ्होली फाट्याजवळ, चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली) यांनी या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी पोलिसांनी एका दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बुधवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास सार्वजनिक रस्त्यावर फोनवर बोलत थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या हातातील 11 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसका मारून चोरून नेला. याप्रकरणी दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.