Bhosari Crime News : पादचाऱ्याचा मोबाईल दुचाकीस्वारांनी हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका तरुणाचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी हिसका मारून चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 26) रात्री साडेआठच्या सुमारास भोसरी येथे टेल्को रस्त्याकडून शांतीनगरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर घडली.

वैभव पुंडलिक वायकोळे (वय 28, रा. यशवंत नगर, भोसरी) यांनी या प्रकरणी सोमवारी (दि. 27) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास भोसरी येथे टेल्को रस्त्याकडून शांतीनगरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावरून पायी चालत जात होते. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने वैभव यांच्या हातातून १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसका मारून चोरून नेला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.