Chikhali Crime News : शतपावली करत असलेल्या महिलेच्या गळ्यातील 97 हजारांचे गंठन हिसकावले

एमपीसी न्यूज – दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी शतपावली करत असलेल्या महिलेच्या गळ्यातील 97 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसका मारून चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 29) रात्री सव्वानऊ वाजता चिखली येथील दुर्गानगर रस्त्यावर घडली.

याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या जेवन करून राहत्या घरातून सुदर्शननगर येथून सोनवणे वस्ती रस्ता चिखली येथे पायी चालत होत्या. त्या दुर्गानगर येथे आल्या असता दुचाकीवरील दोन चोरटे त्यांच्याजवळ आले. फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याच्या गंठला हिसका देऊन त्यांनी 97 हजार रुपये किमतीचे गंठन हिसकावून चोरून नेले.  याप्रकरणी चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.