Pune News : रेल्वे प्रवासात भेटणार ‘बिरबल’; डेक्कन क्वीन आणि इंद्रायणी एक्स्प्रेसचा समावेश

एमपीसी न्यूज – रेल्वे प्रवास आता अधिक मनोरंजक आणि माहितीपूर्ण होणार आहे. हे ऐकून आश्चर्य वाटले ना, हो पण हे खरे आहे. कारण आपल्या भेटीला येणार आहे बिरबल. हा बिरबल आपल्याला सांगणार आहे प्रवासातील महत्त्वाच्या स्थऴांची माहिती, वैशिष्ट्ये. देशातील 11 रेल्वेगाड्यांमध्ये ही सुविधा असणार आहे. त्यात पुण्यातील डेक्कन क्वीन आणि इंद्रायणी एक्स्प्रेसचा समावेश आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी प्रवास माहितीपूर्ण आणि मनोरंजनात्मक व्हावा, या करिता 10 निवडक रेल्वेत कन्व्हर्सेशन ऑन द मूव्ह ही सुविधा सुरू केली आहे. त्यामुऴे प्रवाशांना वेगऴा अनुभव मिऴणार आहे.

सुविधा कशी मिळणार?

डब्यात ट्रॅव्हल विथ बिरबलचे पोस्टर लावली आहेत. त्यावर क्यूआर कोड दिला आहे. तो मोबाईलवर स्कॅन केल्यानंतर मोबाईल चॅट बॅक्स खुला होईल. त्यावर विविध विंडो खुल्या होतील. त्यात आपल्याला हव्या असणाऱ्या विंडोवर जाऊन आपण विविध माहिती मोफत घेऊ शकतो. यामध्ये प्रवाशांना मोबाईलवरच रेल्वे ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या मार्गावरच्या शहरांची माहिती, तेथील प्रसिध्द स्थऴे,मंदिरांची माहिती मिऴणार आहे.मुलांना कंटाऴा आल्यास विविध खेऴसुध्दा येथे आहेत.

या दहा रेल्वेत सुविधा

रेल्वेने प्रायोगिक तत्वावर 10 गाड्यांमध्ये ही सुविधा दिली आहे.त्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन अन्य गाड्यांमध्ये ही सुविधा सुरू केली जाईल, असे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

मुंबई- भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, मुंबई- वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, मुंबई – पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, मुंबई – पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस,कुर्ला- वाराणसी कामायनी एक्स्प्रेस, कुर्ला- लखनऊ एक्स्प्रेस, कुर्ला-गोरखपूर एक्स्प्रेस व्हाया वाराणसी, कुर्ला-गोरखपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस व्हाया कानपूर, कुर्ला- शालिमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, कुर्ला-गोरखपूर एक्स्प्रेस

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.