Bird Flu : महाराष्ट्रातही बर्ड फ्लू पोहोचला ; पाच जिल्ह्यात संसर्ग झाल्याचे निष्पन्न

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग अजून मावळण्याचे चिन्ह नसताना देशात बर्ड फ्लूचे नवे संकट उभे राहिले आहे. राजस्थान, केरळ, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा या राज्यात हा फ्लू निष्पन्न झाल्यानंतर आता तो महाराष्ट्रात देखील पोहचला आहे. महाराष्टारातील पाच जिल्ह्यात संसर्ग पोहचल्याचे निष्पन्न झाले आहे.

परभणीतील मुरुंबा गावात रविवारी (दि.10) 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाला असल्याची माहिती समोर आली. त्यापाठोपाठ आता मुंबई, ठाणे, बीड व रत्नागिरीतील दापोलीतही बर्ड फ्लू पोहोचल्याचं निष्पन्न झालं आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

_MPC_DIR_MPU_II

राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात दहा राज्यात एवियन इन्फ्लूएंजा पोहल्याचे निष्पन्न झाले आहे. राजस्थानमध्ये 2 हजार 950 पक्षी या संसर्गाने मृत पावले आहेत. आत्तापर्यंत कावळे, स्थलांतर करणारे पक्षी यांचा मृत्यू या विषाणूमुळे झाल्याचे म्हणंटलय.

दरम्यान, बर्ड फ्ल्यूचा आजार हा अत्यंत धोकादायक असून याचा मृत्यूदर हा 10 ते 12 टक्के इतका आहे. त्यामुळे राज्यात हायअलर्ट घोषीत करणं गरजेचं असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील बर्ड फ्ल्यू परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.