Lonavala : संपर्कच्या अनाथ मुलांसोबत साजरा केला मुलीचा पहिला वाढदिवस

अनाथ मुलींना खाऊ व डस्टबीनचे वाटप

एमपीसी न्यूज- मुलीच्या पहिल्या वाढदिवसापासून तिच्यामध्ये सामाजिक भावना रुजावी व समाजातील वंचित घटकासाठी तीने काम करावे या भावनेतून मुलीचा पहिला वाढदिवस संपर्क बालग्राम या संस्थेतील अनाथ मुलांच्या सोबत साजरा करत त्यांना खाऊ व स्वच्छतेचा संदेश देण्याकरिता डस्टबीनचे वाटप करण्यात आले. तुंगार्ली गावातील प्रियंका व विजय दहिभाते या दांम्पत्यांनी हा उपक्रम राबविला.

याविषयी बोलताना प्रियंका दहिभाते म्हणाल्या, “आपण मुलांचे वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतो मात्र समाजात अशी काही मुलं मुली आहेत, ते ह्या सर्व सुखांपासून वंचित आहेत. या मुलांसाठी क‍ाही तरी करायचे तसेच घरात लक्ष्मीच्या रुपाने आलेली देवकी या मुलीमध्ये हे सामाजिक भावनेचे बीज पेरण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला” भविष्यात देखिल वंचित घटकासाठी काम करण्याचा आमचा मनोदया असल्याचे दहिभाते यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.