BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : रवींद्र भेगडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- भाजपा युवा नेते व मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, खाऊ वाटप, शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

रवींद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त नाणे येथील ज़िल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती गणेश गायकवाड, उर्से गावचे उपसरपंच प्रदीप धामणकर,केंद्रप्रमुख मुलाणी सर ,नाणे गावचे सरपंच सिकंदर मुलाणी, उपसरपंच सविता गुरव, सरपंच शालेय शिक्षण समिती अध्यक्षा मनीषा नाणेकर, दत्तात्रय आंद्रे, युवा नेते किरण ठाकर,रमेश गायकवाड, प्रवीण शिंदे, राहुल घाग, सागर दिवेकर, प्रशांत आंद्रे, राजू नाणेकर, मुख्याध्यापिका खोमणे मॅडम उपस्थित होते.

सूत्रसंचालन संगीता गुजर यांनी केले. प्रास्तविक सावंत सर यांनी केले सर्व मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांबवडे येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,खाऊचे वाटप, शाळेसाठी वाटर फिल्टर देण्यात आला.

यावेळी रवींद्र भेगडे,  वि.हि.प.बजरंग दल संयोजक पुणे जिल्हा संदेश भेगडे, संयोजक मावळ तालुका बाळा खांडभोर, उपसरपंच दिपेश नाटक, सरपंच अनिता सचिन नाटक, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नाटक, दत्ताभाऊ नाटक, सचिन नाटक, मंगेश नाटक, विशाल घोजगे, प्रशांत भोसले, अभिजित नाटक, अमोल मनकर, सनी नाटक, समीर भांगरे, शाळेचे सर्व शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते प्रास्तविक व सूत्रसंचालन अभिजित नाटक यांनी केले.

.

HB_POST_END_FTR-A1
.