_MPC_DIR_MPU_III

Birthday Special – फनी व्हिडीओ पोस्ट करुन टायगरने दिशाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Tiger wishes Disha Patani Happy Birthday by posting a funny video

एमपीसीन्यूज : सुशांत सिंह राजपूतच्या ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या दिशा पटानीचा आज वाढदिवस आहे. तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एका चॉकलेटच्या जाहिरातीतून दिशाने करिअरची सुरुवात केली. आज तिचे लाखो फॅन्स आहेत.

चित्रपटात काम करण्याच्या ध्यासाने पछाडलेल्या दिशाने शिक्षण अर्धवट सोडून मुंबईचा रस्ता धरला. येथे कोणाचीही ओळख नाही. अशा परिस्थितीत मुंबईसारख्या शहरात राहणे कठीण असते.

या कठीण दिवसांबद्दल बोलताना दिशा म्हणाली की, ‘मी एकटीच राहत होते आणि स्वत:च्या खर्चासाठी कधीच कुटुंबीयांकडे पैसे मागितले नाही. फक्त ५०० रुपये घेऊन मी मुंबईत आले होते आणि एक वेळ अशी आली की जेव्हा माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते’.

‘नकार तुम्हाला अधिक खंबीर बनवतो हे मला सुरुवातीलाच शिकायला मिळालं. ज्या कारणासाठी तुम्हाला नकार मिळतो, तेव्हा त्यासाठी तुम्ही अधिक मेहनत घेता,’ असं ती पुढे म्हणाली.

_MPC_DIR_MPU_II

मात्र, ‘धोनी’ या चित्रपटाच्या यशानंतर दिशाचे आयुष्य बदलले. आज ती लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तशीच ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

मादक फोटो आणि व्हिडीओजमुळे ती नेहमीच चर्चेत असते. यावेळी ती आपला बॉयफ्रेंड अभिनेता टायगर श्रॉफमुळे चर्चेत आहे. टायगरने एक व्हिडीओ पोस्ट करुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

टायगरने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दिशा भन्नाट डान्स करताना दिसत आहे. परंतु, हा डान्स करताना तिने आपल्या चेहऱ्यावर कुठलेही हावभाव उमटू दिले नाहीत.

परिणामी हा व्हिडीओ थोडा गंमतीशीर वाटतोय. ‘३ वेफल्स, ३ पॅनकेक्स. हॅप्पी बर्थडे रॉकस्टार’ असं म्हणत टायगरने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1