Birthday Tribute: अवलिया संगीतकार – पंचम अर्थात आर. डी. बर्मन

Birthday Tribute: All-rounder Musician - Pancham means R. D. Burman पंचमच्या ऑफबीट गाण्यांना जशी आशाने समर्थपणे साथ दिली, तशीच व्यक्तिगत आयुष्यात देखील दिली.

एमपीसी न्यूज – ‘पंचमदा’ या नावाने लोकप्रिय असलेले संगीतकार आरडी अर्थात राहुल देव बर्मन यांचा आज जन्मदिवस. लौकिकार्थाने पंचमदा आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या मनात रुंजी घालणा-या स्वररचनांच्या रुपात ते आजही आपल्या आजूबाजूला आहेत.

ज्येष्ठ संगीतकार एस. डी. बर्मन म्हणजे सचिन देव बर्मन यांचे चिरंजीव म्हणजे आरडी बर्मन. अगदी बापसे बेटा सवाई. सचिनदा आपल्या हळुवार मेलडीने भारलेल्या गाण्यासाठी प्रसिद्ध तर पंचम म्हणजे ब-याच वेळा तालावर नाचवणारी गाणी देणारा संगीतकार. मात्र आरडींच्या या लौकिकाला त्यांनीच अनेकदा छेद दिला. आठवा ‘इजाजत’ मधली अलवार प्रेमगीते.

आरडी आणि आशा भोसले हे असंच एक भन्नाट कॉम्बिनेशन. त्यांनी वैयक्तिक आयुष्यात देखील एकमेकांना साथसोबत केली. पंचमच्या ऑफबीट गाण्यांना जशी आशाने समर्थपणे साथ दिली, तशीच व्यक्तिगत आयुष्यात देखील दिली. त्यांची दोघांची पहिली भेट 1956 मध्ये झाली. तेव्हा आशा भोसले या नावाला फिल्म इंडस्ट्रीत चांगली ओळख होती तर पंचमची सुरुवात होती.  त्यानंतर सुमारे दहा वर्षांनंतर, जेव्हा आर डी बर्मनने ‘तीसरी मंजिल’ चित्रपटासाठी आशा भोसले यांच्याकडे संपर्क साधला त्यानंतर आशा आणि पंचमची जादू लोकांसमोर आली.

पंचमने पुढे आशाच्या साथीने अनेक चित्रपट गाजवले. त्यांचे खास गाजलेले चित्रपट म्हणजे हरे रामा हरे कृष्णा, अपना देश, कारवा, सीता और गीता, मेरे जीवनसाथी, यादों की बारात, आप की कसम, शोले, हम किसीसे कम नही, खुबसुरत, समन तेरी कमस, घर हे आणि इतरही अनेक.

वैयक्तिक आयुष्यात देखील पंचम आणि आशा यांची जोडी जमली होती. पुढे १९८० साली आरडी बर्मन आणि आशा भोसले यांनी लग्न केले. अर्थात त्यांच्या लग्नाचा मार्ग इतका सोपा नव्हता. आशा पंचमपेक्षा मोठी होती त्यामुळे तिची आई या नात्याच्या विरोधात होती. जेव्हा पंचमने त्याच्या आईशी लग्न करण्यास परवानगी मागितली तेव्हा त्याने स्पष्टपणे नकार दिला. आरडी बर्मनला लग्नासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली, परंतु पंचम आणि आशा भोसले यांच्या संगीतमय लव्ह स्टोरीचा प्रवास फार काळ टिकू शकला नाही आणि लग्नाच्या 14 वर्षानंतर, पंचमदा 54 व्या वर्षी जग सोडून गेले.

त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी संगीतबद्ध केलेल्या १९४२ अ लव्ह स्टोरी या चित्रपटाची गाणी प्रचंड गाजली. पण तो पर्यंत आपण एका गुणी संगीतकाराला गमावले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.