Birthday wishes to Katrina : चिकनी चमेली कतरिनावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव

Happy Birthday to Katrina बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी कतरिना मॉडेलिंगमध्ये आपले नशीब आजमावत होती.

एमपीसी न्यूज – आपल्या मेहनतीच्या जोरावर एका मूळच्या परदेशी असलेल्या अभिनेत्रीने येथे आपली उत्तम करियर घडवली. आज ती रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. अभिनय फारसा प्रभावी नसला तरी तिचे मनमोहक हास्य प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेते, अशी कतरिना कैफ हिचा आज वाढदिवस. तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बॉलिवूडच्या चिकनी चमेली कतरिनाने कमी कालावधीत कलाविश्वात तिचा दबदबा निर्माण केला आहे.

कतरिनाने वयाच्या चौदाव्या वर्षीच एका ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये मानाचा क्राउन मिळवला होता. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी कतरिना मॉडेलिंगमध्ये आपले नशीब आजमावत होती. विशेष म्हणजे लंडनमधील एका फॅशन शो दरम्यान दिग्दर्शक कैझाद गुस्ताद यांनी कतरिनाला पहिल्यांदा पाहिलं आणि तेथेच त्यांनी तिला ‘बूम’ या चित्रटाची ऑफर दिली. खरंतर कतरिनासाठी ही फार मोठी संधी होती. मात्र २००३ साली प्रदर्शित झालेला ‘बूम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही गाजला नाही. त्यासोबतच तिने अनेक तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं होतं.

कतरिना कैफ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीच्या आडनावाविषयी फार कमी जणांना माहित आहे. कैफ हे कतरिनाच्या वडिलांचं आडनाव असलं तरीदेखील कतरिना प्रथम आईच्या आडनावामुळे ओळखली जायची. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी कतरिना तिचं आडनाव ‘टरकोटा’ असं लावायची. मात्र हे आडनाव उच्चारण्यास कठीण असल्यामुळे तिने ते बदलून वडिलांचं कैफ हे आडनाव लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे कतरिना टरकोटाची, कतरिना कैफ झाली.

कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे ब्रिटीश व्यावसायिक आहेत आणि आई सुझेन वकील आहे. कतरिनाला सहा बहिणी आणि एक भाऊ आहे. कतरिनाच्या तीन मोठ्या बहिणींची नावे स्टेफनी, ख्रिस्टीन आणि नताशा असून मेलिसा, सोनिया आणि इसाबेल छोट्या बहिणींची नावे आहेत. तिच्या भावाचे नाव मायकल असे आहे. तिची बहिण इसाबेल कैफसुद्धा मॉडेल आणि अभिनेत्री आहे. कतरिना लहान असतानाच तिच्या आई-बाबांचा घटस्फोट झाला आणि तिचे बाबा युएसला गेले. त्यामुळे लहानपणापासून आईनेच सर्वांचे संगोपन केल्याचे कतरिनाने एका मुलाखतीत सांगितले होते.

View this post on Instagram

Happy bday Katrina . . @katrinakaif

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.