BNR-HDR-TOP-Mobile

Pune : भाजपने केला कोथरूडचा संकल्पनामा प्रसिद्ध

शिवसृष्टी करणारच, दरवाजापर्यंत मेट्रो नेणार - चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – भाजपने आज कोथरूडचा संकल्पनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत चांदणी चौकात भव्य अशी शिवसृष्टी उभारणार आहे. या ठिकाणच्या दरवाजापर्यंत मेट्रो नेणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
यावेळी खासदार गिरीश बापट, माजी खासदार अनिल शिरोळे, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शाम देशपांडे, माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, दीपक पोटे उपस्थित होते.
या संकल्पनामा पत्रात वनाझ – रामवाडी प्रकल्प, वारजे – नळस्टॉप मेट्रो मार्गासाठी पाठपुरावा, सुरळीत वाहतूक, निर्धोक प्रवास, स्वच्छ कोथरूड, हरित कोथरूड, सिलेंडरमुक्त कोथरूड, आयटी लघुउद्योजक, वातावरणातील बदल, पदपथावरचे अतिक्रमण रोखणार, सहा मिटरवरील इमारतींचा पुनर्विकास, विकास आराखडा, संरक्षण नदीचे कल्याण जनतेचे, बीडीपी आरक्षित टेकड्यांचे संरक्षण, झोपडपट्टी पुनर्विकास, पानशेत व शिवणे पुरग्रस्तांना न्याय देणे, महिला सुरक्षा, ‘गदिमा भवन’ निर्मिती, हस्यभवन निर्मिती, नाट्य अकादमी आणि प्रायोगिक रंगभूमीसाठी विशेष नाट्यगृह उभारणार, कोथरूडमध्ये जागतिक दर्जाचे नाट्यमंदिर उभारणार, पाषाण तलाव विकसित करणे, 24 तास पाणी पुरवठा करणे, आरोग्य सुविधा, पोलीस यंत्रणा अद्ययावत करणे, डिफेन्स खात्याच्या ना हरकत प्रमाणपत्राबाबत पाठपुरावा करणे, ज्येष्ठ नागरिकांना सोयीसुविधा पुरविणे, यावर भर देणार असल्याचे म्हटले आहे.
कोथरूडमध्ये काही नगरसेवक प्रचारात सहभागी झाले नाहीत. त्यांची काही नाराजी आहे का? असा सवाल केला असता, कोणतेही नगरसेवक नाराज नाही. सर्वजण प्रचार करीत आहेत. कोण प्रचार करीत नसेल तर तुम्ही कानात सांगा, अशी मिश्किल टिप्पणी पाटील यांनी केली.
HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like