Pune : 20 कोटी 62 लाख रुपये वर्गीकरणाचा प्रस्ताव भाजपने बहुमताच्या जोरावर केला मंजूर

एमपीसी न्यूज – २० कोटी ६२ लाख रूपयांच्या वर्गीकरणाच्या प्रशासनाच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली़ कोट्यावधी रूपयांचा वर्गीकरणाचा हा प्रस्ताव केवळ बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठीच आणला गेल्याचा आरोप शिवसेना नगरसेवकांनी केला. तसेच, या प्रस्तावाला विरोध केला. त्यावर ४२ विरूद्ध ९ अशा फरकाने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. 

पुणे महापालिकेच्या पथ विभागाने शहरातील रस्ते व संबंधित कामांसाठी वर्गीकरणाचा प्रस्ताव दाखल केला होता. यामध्ये १७ कोटी २५ लाख रूपये हे बालेवाडी येथील सर्व्हे क्रमांक ३२ ते ३४ मधील डीपी रस्त्यासाठी भूसंपादन केल्यापोटी संबंधितांना मोबदला रक्कम म्हणून देण्यात येणार आहे़. उच्च न्यायालयाने भूसंपादनाचा हा मोबदला देण्याबाबत पालिकेला नुकतेच आदेश दिले होते.

लेक टाऊन सिटी, बिबवेवाडी, आंबेगाव बुद्रुक व आदी भागातील रिटेनिंग वॉल, कल्व्हर्ट बांधण्यासाठीही या वर्गीकरणातील निधी प्राधान्याने खर्च केला जाणार असल्याचे यावेळी पथ विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.