BJP Candidate List : भाजपाची 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP Candidate List) पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

16 राज्यांमधील 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा उत्तरप्रदेश मधील वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.  तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दुसऱ्यांदा गुजरात मधील गांधीनगरमधून  लढणार आहेत.

Pune: पवारांचे कट्टर विरोधक अनंतराव थोपटे यांची सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट

पहिल्या यादीत 34 विद्यमान मंत्र्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही.

भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन यादी जाहीर केली. उत्तर प्रदेशमधील 51, पश्चिम बंगालमधील 20, मध्य प्रदेशमधील 24, गुजरातमधील 15, राजस्थानमधील 5, केरळमधील 12, तेलंगणामधील 9, आसाममधील 11, झारखंडमधील 11, छत्तीसगडमधील 11, दिल्लीमधील 5, जम्मू काश्मीरमधील 2, उत्तराखंडमधील 3, अरुणाचल प्रदेशमधील 2, गोव्यातील 1, त्रिपुरामधील 1, अंदमान निकोबारमधील 1 आणि दिव-दमणमधील एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.