Chinchwad Bye Election : उमेदवारी जगताप कुटुंबातच; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्पष्ट संकेत

एमपीसी न्यूज – चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबात पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्यासाठी कोणाचेही दुमत नाही.  (Chinchwad Bye Election) इच्छुकांची नावे प्रदेशकडे पाठविली जातील. प्रदेशची कमिटी नाव निश्चित करेल आणि दिल्लीतून उमेदवाराचे नाव जाहीर होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे जगताप यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अजितदादांपासून उद्धवजींची भेट घेणार आहे. राजकारणात आत्ता काही घडत असल्यास त्याच्या दुस-या मिनिटाला काहीही होवू शकते असे सूचक विधानही त्यांनी केले. आता जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप की बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवडमधील भाजप कोअर कमिटीची पूर्वतयारी आढावा बैठक झाली. त्यानंतर पाटील यांनी बैठकीतील माहिती पत्रकारांना दिली.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, अश्विनी जगताप, (Chinchwad Bye Election) शंकर जगताप, सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, अमोल थोरात, आरपीआएच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते.

Pune News : गणेश जन्म सोहळ्यानिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात आकर्षक आरास, भाविकांची गर्दी

पालकमंत्री पाटील म्हणाले, ”लक्ष्मणभाऊ जगताप आमचे नेते होते. शहराच्या लोकांचे आधार होते. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वार्धाने प्रयत्न करणार आहोत. पण, गाफील न राहता पूर्वतयारीचा आढावा घेतला”.

”उमेदवारी ठरविण्यासाठी ही बैठक नव्हती. इच्छुकांची नावे प्रदेशकडे जातात. प्रदेशची कोअर कमिटी दिल्लीत नाव पाठवेल आणि दिल्लीतूनच उमेदवाराचे नाव जाहीर होईल. निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. बुथचा आढावा घेतला. मागीलवेळी कमी मते पडलेल्या बुथची माहिती घेतली. पूर्ण आढावा घेतला”.

”निवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडे किती जणांना इच्छा व्यक्त केली आहे असे विचारले असता पालकमंत्री पाटील म्हणाले, राजकारणात काम करत असताना इच्छा असते. (Chinchwad Bye Election) इच्छा असणे गुन्हा नाही आणि चुकीचेही नाही. महेश लांडगे इच्छुकांशी बोलतील. इच्छा, आग्रह व्यक्त करण्याची ही वेळ नाही”.

”लक्ष्मणभाऊंवर प्रेम करणारे खूप लोक आहेत. त्यामुळे निवडणूक कठिण नाही. जगताप कुटुंबात उमेदवारी देण्याबाबत कोणाचेच दुमत नाही. पण, उमेदवार कोण असावा हे प्रदेश कार्यकारिणी निश्चित करेल”.

”निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सर्वांना पत्रे दिली जातील. राष्ट्रवादीचे अजितदादा आणि शिवसेनेचे उद्धवजी यांची भेट घेणार आहे. राजकारण मिनिटा मिनिटाला बदलते”, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.

पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याच्या पाठीमागे –   शंकर जगताप

भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप म्हणाले, पोटनिवडणुकीला कसे सामोरे जायचे याबाबत पालकमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. उमेदवारीबाबत अजून काहीही ठरले नाही. जगताप कुटुबियांचे तुम्ही पाहिलेच असेल. लक्ष्मणभाऊ आजारी असतानाही पक्षनिष्ठच होते. ते जीवावर बेतून राज्यसभा, विधानपरिषदेच्या निवडणूक मतदानाला गेले होते.

त्यामुळे जगताप कुटुंबिय हे पक्षनिष्टच आहे. आम्ही अजून दुखातून सावरलो नाहीत. त्यामुळे घरात राजकीय कोणतीही चर्चा झालेली नाही. पक्षाने बोलविले म्हणून बैठकीला हजर झालो. (Chinchwad Bye Election) पक्ष ज्याला उमेदवारी देईल. त्याच्या पाठीमागे आम्ही असणार आहोत, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.