Pune : भाजपचे नगरसेवक गणेश बिडकर यांच्या मांडीला लागली गोळी ; रुग्णालयात उपचार सुरू 

एमपीसी न्यूज – भाजपचे नगरसेवक गणेश बिडकर यांच्या मांडीला पिस्तुल साफ करत असताना चुकून गोळी सुटली आणि त्यांच्या मांडीला लागली. ही घटना आज गुरुवारी(दि.27) साडेबारा च्या सुमारास वढू जवळील अपटी या गावामध्ये त्यांच्या शेतात घडली.

_MPC_DIR_MPU_II
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार, भाजप नगरसेवक गणेश बिडकर हे त्यांच्या गाडीमध्ये पिस्तुल साफ करत होते. दरम्यान चुकून पिस्तुल साफ करत असताना 1 गोळी सुटून त्यांच्या मांडीला लागली. यामध्ये बिडकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यांच्या मांडीला गोळी लागली असल्याचे समजत असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1