Pune News : भाजप नगरसेवक विजय शेवाळे यांचे निधन

एमपीसी न्यूज :  औंध भागातील भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नगरसेवक विजय बाबुराव शेवाळे यांचे काल (22 डिसेंबर) रात्री  दिर्घ आजाराने दु:खद निधन झाले.

ते उद्योजक म्हणून काम करत असल्यामुळे अनेक वर्षे राजकीय क्षेत्रात कार्यरत नव्हते. परंतु 2017 च्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना प्रभाग क्रमांक 8 अ मध्ये चार सदस्यीय पॅनेल पद्धतीमध्ये निवडणुकीत ते पहिल्यांदा नगरसेवकपदी निवडून आले.

त्यांचे बंधू सुरेश शेवाळे हे देखील माजी नगरसेवक होते. त्यांच्यामागे पत्नी व मुले असा परिवार होता. त्यांचा अंत्यविधी दुपारी 12 वाजता बोपोडी स्मशानभुमी येथे होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.