Bhosari News : भाजप नगरसेविकेच्या मुलाला अटक

एमपीसी न्यूज – भाडे वाढवून न दिल्याने जिमचे कुलूप तोडून तोडफोड केली. दोन लाखांचे नुकसान करून टेबलच्या ड्रॉवरमधून रोख आठ हजार रुपये काढून घेऊन चोरून नेले. तसेच जिमला दुसरे कुलूप लावले. ही घटना 25 जानेवारी ते 14 मार्च दरम्यान भोसरी येथे घडली. त्या गुन्ह्यात भाजप नगरसेविकेच्या मुलाला पोलिसांनी वर्षभरानंतर अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

प्रशांत पोपट फुगे (वय 35) असे अटक केलेल्याचे नाव आहे. प्रशांत हा भाजप नगरसेविका भीमाबाई फुगे यांचा मुलगा आहे. याबाबत अनिल अशोक फुगे (वय 38, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल फुगे हे जिम ट्रेनर आहेत. त्यांनी जिमचे भाडे वाढवून दिले नाही म्हणून आरोपी प्रशांत व सम्राट यांनी त्यांच्या जिमचे कुलूप तोडून स्वत:चे कुलूप लावले. तसेच जिममधील पीओपी, कारपेट तोडून जिमची मशिनरी टेरेसवर टाकून त्या तोडून दोन लाख रुपयांचे नुकसान केले. तसेच टेबलच्या ड्रावरमधून आठ हजार रुपये काढून चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्या प्रकरणात एक वर्षानंतर अटक करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.