Pune : भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय केला : सुप्रिया सुळे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला

एमपीसी न्यूज – मी जर (उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) त्यांच्या जागी असते, तर मला फार वाईट वाटले असते. पण आपले देवेंद्र फडणवीस बिचारे, मी 105 आमदार निवडून आणायचे, मी मुख्यमंत्री व्हायचे नाही आणि मला डीमोशन देऊन माझ्याच पदाचा आणखी एक माणूस माझ्या बाजूला द्यायचा. पाच वर्ष मुख्यमंत्री पद सांभाळलेल्या एवढ्या सक्षम व्यक्तीवर त्यांच्याच घरातील मंडळीनी अन्याय केला आहे.

Dighi : मोबाईल चोरून त्यातील ॲप द्वारे खात्यातून 94 हजार रुपये चोरले

त्यामुळे भारतीय जनता पार्टीने जरी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय केला असला, तरी मी एक सहकारी म्हणून त्यांचा निश्चित मान सन्मान करेल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदार संघातील प्रश्ना बाबत पुणे (Pune) महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला असता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पाडण्यात देवेंद्र फडणवीस हे आहेत का ? त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली.

राज्य सरकारने लवकरात लवकर महापालिका निवडणुका घ्याव्यात : सुप्रिया सुळे
राज्यातील महापालिकेच्या निवडणूक अनेक वर्षापासुन झाल्या नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जर महापालिका निवडणुका झाल्या तर नगरसेवक प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडू शकतात. मात्र आता नगरसेवकच नसल्याने नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन कोणाकडे जायचे आणि आपले प्रश्न कोण सोडविणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर महापालिका निवडणुका घ्याव्या अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. तर पुणे शहरातील काही भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येत असून तेथील प्रश्न लवकरच मार्गी लागतील अशी ग्वाही महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिल्याचे यावेळी सुप्रिया यांनी सांगितले.

श्रेयवादापासून दूर राहा, शेतकर्‍यांच्या दृष्टीने निर्णय घ्या : सुप्रिया सुळे
राज्यातील अनेक भागात अद्यापपर्यंत पाऊस झाला नाही.त्यामुळे शेतकर्‍यां समोर पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातही प्रामुख्याने जनावरांसाठी चारा छावण्या तातडीने सुरू कराव्या लागतील. त्या पार्श्वभूमीवर सध्याच्या राज्य सरकारने आढावा घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि श्रेयवादापासून दूर राहा, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारला टोला लगावला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.