Maharashtra News : सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री पदासाठी भाजपचा पाठिंबा नाही – चंद्रकांत पाटील

0

एमपीसी  न्यूज: राज्याचे मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा महिला असावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजात माेठा वर्ग आहे. यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीचे 100 टक्के समर्थन असून शकते असे मत भाजप आमदार आशिष शेलार यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले हाेते. याप्रसंगी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व्यासपीठावर उपस्थित असल्याने, शेलारांचे वक्तव्यानंतर साेशल मिडियावर खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून चर्चा रंगली. मात्र, सुप्रिया सुळे यांना मुख्यपंत्री पदासाठी भाजपचा पाठिंबा देण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याची भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

पाटील म्हणाले, सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करावयाचे की नाही याचा निर्णय राष्ट्रवादी काॅंग्रेस घेईल. शेलार यांचे वक्तव्य हे केवळ पत्रकार विजय चाेरमारे यांचे ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाशी संबंधित आहे. सर्वाधिक महिला आमदार भाजपच्या आहेत, सर्वाधिक मराठा, ओबीसी, अनुसूचित जाती-जमातीचे आमदार भाजपचे आहेत. सर्वसमावेशक भाजप पक्ष असून ओबीसी नेतृत्वाचे एक वेगळे स्थान पक्षात राहिले आहे. ओबीसी समाजाला हा पक्ष आपला वाटताे आणि ती अधिकाधिक त्यांना वाटावी याकरिता प्रयत्न केले गेले पाहिजे.

राज्यभरातील निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला नागरिकांनी सपाटून मारल्याचे  दिसून येईल. महाराष्ट्रात मंत्रीमंडळात एक मंत्री आहेत जे 2014 मध्ये हरल्यानंतर सहा महिने एकटे रडत बसले हाेते, परंतु सध्या मंत्री बनले आहेत. कालचक्र फिरत असते व त्यानुसार संधी मिळत असते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III