Devendra Fadnavis on State Government: खोटा प्रचार करुन केंद्राची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न-फडणवीस

bjp leader devendra fadnavis slams on maharashtra state government cm uddhav thackeray congress ncp on covid-19 relief

एमपीसी न्यूजः केंद्र सरकारने राज्याला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. तरीही महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचे सांगत केंद्र सरकारची प्रतिमा मलीन केली जात असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. केंद्र सरकारने महाराष्ट्राला केलेल्या मदतीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले. त्या अंतर्गत अन्नधान्य देण्यात आले. केंद्राने वेगवेगळ्या माध्यमातून राज्य सरकारला मदत केली. देशातील सर्व राज्यांना या मदतीचे वाटप होत आहे. महाराष्ट्रालाही मोठ्याप्रमात निधी देण्यात आला. परंतु, महाराष्ट्रावर अन्याय होत आहे, असा खोटा प्रचार सुरु करण्यात आला.

केंद्राने गरिबांना स्वस्त धान्याचा पुरवठा केला. कृषी सन्मान योजना, जनधन योजनेतून निधीचा पुरवठा केला. मजुरांच्या छावण्यासाठी १६११ कोटी रुपये दिले. महाराष्ट्रातून सुमारे ६०० रेल्वे सोडल्या. श्रमिक रेल्वेसाठी ३०० कोटी रुपये दिले. उज्जवला योजनेतून १६०० कोटी रुपये दिले. सुमारे १९ हजार कोटी या मदतीच्या माध्यमातून महाराष्ट्राला केंद्राने दिले. त्याचबरोबर पीपीई किट आणि एन-९५ मास्कचा पुरवठा केंद्राने राज्याला केला.

काही लोकांकडून जीएसटीचे काहीही आकडे सांगितले जात आहेत. उत्पन्नाचे २०१६ हे वर्ष गृहीत धरुन दरवर्षी त्यात वाढ केली जाते. त्याप्रमाणे निधी दिला जात आहे. जीएसटीचा नोव्हेंबरपर्यंतचा निधी राज्याला चुकता केला आहे. त्यानंतरच्या निधीबाबत जीएसटी काऊंसील निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नोव्हेंबरनंतरच्या निधीबाबत जीएसटी कौन्सिल निर्णय घेणार आहे. आजूबाजूच्या सर्व राज्यांनी योजन जाहीर करुन पैसा उपलब्ध करुन दिला आहे. रिझर्व्ह बँकेनेही कर्जाची मर्यादा वाढवून दिली आहे. आता महाराष्ट्र सरकारने धाडसी पावले उचलली पाहिजेत, असे ते म्हणाले.

अपयशाचे खापर उद्धव ठाकरेंवर फोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. महाराष्ट्रात आमच्या आघाडीचे सरकार असले तरी काँग्रेसचे ऐकले जात नाही, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी मंगळवारी केले होते. त्यावर फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचे आश्चर्य वाटत असल्याचे म्हटले.

राज्यातील कोरोनाची स्थिती हाताबाहेर जात असल्याने काँग्रेसचा हा कांगावा सुरु असल्याचे त्यांनी म्हटले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्यात उपचार मिळत नाहीत. अॅम्ब्युलन्सचा तुटवडा आहे. त्यामुळे काँग्रेस उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर अपयशाचे खापर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांनी आरोप केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.