Pune : वाढत्या महागाईच एक कारण म्हणजे भ्रष्टाचार : किरीट सोमय्या 

भाजपला किरीट सोमय्या यांचा घरचा आहेर 

एमपीसी न्यूज :  मागील काही महिन्यापासून केंद्र सरकार मार्फत सतत पेट्रोल,डिझेल आणि गॅस दरवाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकाचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यात सत्ताधारी भाजपकडून कोणताही नेता भूमिका मांडत नाही. (Pune) त्याच दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे पुणे दौर्‍यावर आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनी वाढत्या महागाई बाबत विचारले असता ते म्हणाले की,वाढत्या महागाईच एक कारण म्हणजे भ्रष्टाचार असून सत्ताधारी पक्षाचे नेते आणि अधिकारी जे पैसे लुटण्याच काम करतात. तो पैसा तेथूनच येत आहे.अशी भूमिका मांडत केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपला किरीट सोमय्या यांनी घरचा आहेर दिला आहे.

Gold Rate : रामनवमीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचं आहे? जाणून घ्या पुण्यातील आजचे दर

तसेच ते पुढे म्हणाले की,पेट्रोलियम पदार्थाच्या दरवाढी बाबत सांगायचे झाल्यास यूक्रेन युद्धाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य नियोजन करून रशियासोबत करार केला.(Pune) त्यावेळी पाकिस्तान, श्रीलंका या देशात प्रचंड भाववाढ झाली.पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया सोबत करार केल्यामुळेच आपल्याकडे भाववाढ नियंत्रणात ठेवू शकलो आहे. तसेच वाढत्या महागाई बाबत केंद्र सरकारकडून योग्य ती पावल उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.