Jammu Kashmir: कुलगाम येथे दहशतवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या

Bjp Leader Sarpanch Sajad Ahmad Khanday, who was fired upon by terrorists, succumbs to his injuries यापूर्वी जून महिन्यात काश्मिरी पंडित सरपंच अजय पंडित यांची हत्या करण्यात आली होती.

एमपीसी न्यूज- जम्मू-काश्मीरमधील कुलगामचे सरपंच सज्जाद अहमद खांडे यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. सज्जाद अहमद खांडे यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सज्जाद अहमद हे भाजपचे नेते होते. यापूर्वी जून महिन्यात काश्मिरी पंडित सरपंच अजय पंडित यांची हत्या करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सज्जाद यांच्यावर कुलगाम जिल्ह्यातील वेस्सू येथील त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

काश्मीर खोऱ्यात 48 तासांच्या आत सरपंचावर हल्ला होण्याची ही दुसरी घटना होती. यापूर्वी 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी कुलगाम जिल्ह्यातील मीरबाजारमधील अखरान परिसरात पंच पीर आरिफ अहमद शाह यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांच्यावर श्रीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.