MLA Uma Khapre : आमदार उमा खापरे यांची ‘ईएसआय’ हॉस्पिटलला अचानक भेट

एमपीसी न्यूज : भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी आज (गुरुवारी) चिंचवड, मोहननगर येथील ‘ईएसआय’  हॉस्पिटलला अचानक भेट दिली.(MLA Uma Khapre) रुग्णालयाची पाहणी केली. हे हॉस्पिटल 2009 मध्ये सुरु झाल्यापासून आजतागायत तिथे आयसीयूची सेवा सुरु झाली नसल्याचे समोर आले.

माजी उपमहापौर केशव घोळवे, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, राजू प्रधान, रोशन ताथेड, गणेश लंगोटे आदी उपस्थित होते.(MLA Uma Khapre) रुग्णालयाची माहिती अधीक्षक डॉ. भारती पाटील यांच्याकडून घेतली. असंघटित गोरगरिब कामगारांना ‘ईएसआय’ हॉस्पिटलच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे उपचार मिळावेत. गंभीर, दीर्घ आजारांवर त्यांना मदत मिळावी. हॉस्पिटलची क्षमता 100 बेडची असून तिथे 30 ते 50 टक्के रुग्ण नियमित उपचार घेतात. एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी मशीनची उपलब्धता नाही. रुग्णांच्या सेवेसाठी कार्डियाक रुग्णवाहिका नाही. वैद्यकीय स्टाफ एमपीएससीच्या माध्यमातून 2003 पासून भरण्यात आलेले नाहीत. सहा एकर क्षेत्रामध्ये हॉस्पिटल, स्टाफ निवासस्थानाचे नियोजन आहे. परंतु, काम अद्यापपर्यंत सुरु झाले नाही. या समस्या शासनाच्या माध्यमातून सोडविण्याची ग्वाही आमदार खापरे यांनी दिली.

PCMC News : आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. पवन साळवे तर प्रमोद ओंभासे यांना सह शहर अभियंतापदी पदोन्नती

शहर औद्योगिक, कामगारनगरी म्हणून जगभर ओळखले जाते. गोरगरीब असंघटित कामगारांचे आरोग्य चिकित्सा शिबिर झाले पाहिजे.(MLA Uma Khapre) त्यांना गंभीर व दीर्घ आजारावर मोफत उपचार मिळाले पाहिजेत. कामगारांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती झाली पाहिजे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.