Solapur News: भाजप आमदाराच्या लग्नाला हजारोंच्या गर्दीमुळे सोशल डिस्टंन्सिगचा फज्जा !

BJP MLAs' wedding caused a social distancing disturbance due to crowd of thousands!

एमपीसी न्यूज : कोरोनावर औषध येईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून सर्वसामान्य लोकांना विवाह कार्यक्रमात 50 जणांनीच हजर राहायची मर्यादा आहे. पण सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या शाही विवाह सोहळ्यात हजारोंची गर्दी झाल्यामुळे मास्क लावणे, सोशल डिस्टंन्सिगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव असताना आणि अद्याप लस आली नसताना लोकप्रतिनिधीच कोरोनाबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर आहे, अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनाच ‘दो गज की दूरी, मास्क पेहनना है जरूरी’, तसेच ‘जब तक दवाई नही तब तक ढिलाई नहीं’ चा देखील विसर पडला.

विवाह सोहळ्यात ५० जणांची मर्यादा पाळण्याचा नियम लोकप्रतिनिधींनीच मोडणे, हे खेदजनक आहे.

विशेष म्हणजे या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, हर्षवर्धन पाटील अशी खास मंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप आमदार राम सातपुते आणि त्यांच्या पत्नी या दाम्पत्याला विवाह सोहळ्याच्या शुभेच्छा देताना वधू-वर आणि राजकीय वऱ्हाडी मंडळींनी मात्र ‘सर्वसामान्य माणसांना एक नियम आणि आपल्याला एक’ असा भेद करू नये, कायदा आणि नियमांसमोर सर्व समान आहेत याचाच विसर या निमित्ताने पडल्याचे दिसून आल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.