Pune : भाजप – सेनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘सदबुद्धी’ आंदोलन ( व्हिडीआे)

एमपीसी न्यूज – भाजप – शिवसेना जातीयवादी सरकारने महाराष्ट्रातील जनतेला घरपोच दारु पुरवुन जनतेचे संसार उध्वस्त करण्याचा डाव खेळला आहे तसेच महापुरुषांच्या बाबतीत चुकीचा व आक्षेपार्ह मजकुर छापुन महापुरुषांची बदनामी करण्याचा  जो उद्योग चालविला आहे असा आरोप करत राज्य सरकार विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली “सदबुद्धी आंदोलन ” करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी टाळ -मृदंगाच्या गजरात भजन म्हणून या सरकारला भगवंताने सदबुद्धी देवो अशी प्रार्थना केली.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले, सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल अतिशय विकृत पध्दतीचे लिखाण करण्यात आले आहे. तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पत्नीबद्दल सुध्दा आक्षेपार्ह पध्दतीचे लिखाण याच पुस्तकात झालेले आहे. या सर्व गोष्टींसाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर सरकारने लवकरात लवकर कारवाई करावी. दारुचा नियम पहिल्यांदा 500 मीटर केला नंतर 250 केला आता तर थेट घरपोच दारु पुरवणार आहे.
या राज्यातील युवकाला रोजगार पाहिजे तो मिळत नाहिये , जनतेला पाणी पाहिजे ते मिळत नाही, विज पाहिजे ती मिळत नाही पण या भाजपा – शिवसेना सरकारने घरपोच दारु पुरवुन युवकांची माथी भडकवुन दंगली करायच्या आहेत व स्वतःची सत्तेची पोळी भाजुन घ्यायची आहे. जनतेला पाणी देणार सरकार पाहिजे दारु देणार नाही. 2014 ला घर घर मोदी हि घोषणा होती आता 2019 ला घर घर दारु हि घोषणा भाजपा ने केली आहे.
यावेळी माजी आमदार बापु पठारे, रवींद्र माळवदकर, बाळासाहेब बोडके, बंडुतात्या गायकवाड, नगरसेवक विशाल तांबे, सुभाष जगताप, सुनिल टिंगरे, वनराज आंदेकर, महेंद्र पठारे, सुमनताई पठारे, लक्ष्मीताई दुधाणे,रुपाली चाकणकर, श्रीकांत पाटील,उदय महाले,नितीन कदम ,नारायण लोणकर,निलेश निकम ,हाजी फिरोज,फहिम शेख ,नंदिनी पाणेकर , महेश हांडे , प्रदिप देशमुख,संतोष नांगरे , अभिषेक बोके , रविकांत वर्पे , प्रेम भांडे पाटील,अच्युत लांडगे ,गणेश नलावडे,रजनी पाचंगे ,किशोर कांबळे, सदाशिव गायकवाड,विकी वाघे,शांतिलाल मिसाळ,ऋषीकेश भुजबळ, धिरज अरगडे ,मयुर गायकवाड,सुनिल बनकर, बाबा पाटील, निलेश वरे, किरण कद्रे, केतन ओरसे असंख्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
https://www.youtube.com/watch?v=BKwjT0d-ulA&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.