Pune News :  महावितरणच्या कर्मचाऱ्याला भाजप पदाधिकाऱ्याकडून मारहाण

एमपीसी न्यूज : वीजबिल थकीत असल्यामुळे वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला पुण्यातील भाजपच्या माजी नगरसेवकाने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आंबील ओढा परिसरातील सानेगुरुजी वसाहत येथे गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्यासह आणखी एका वर दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणी  फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नवीपेठेतील महावितरण कार्यालयात नेमणुकीस आहेत. वीजबिल थकीत असल्यामुळे आंबील ओढा परिसरात वीज बिल वसुली साठी गेले होते. सकाळी 11 वाजेच्या सुमारास ते थकित विजबिलामुळे वीज कनेक्शन कापत असताना आरोपी धनंजय जाधव त्या ठिकाणी आला आणि त्याने अश्लील भाषेत शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली.

आणि ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्याने ठार मारण्याची धमकी दिली. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.