Pimpri-Chinchwad rally: शाहूनगर मध्ये फाळणी स्मृतिदिनानिमित्त मूक मिरवणूक

एमपीसी न्यूज: पिंपरी-चिंचवड 14/8-आधार महिला मंडळ शाहूनगरच्या अध्यक्षा आणि भाजप पिंपरी-चिंचवड महिला आघाडीच्या उपायध्यक्षा सौ.सुप्रिया चांदगुडे यांच्या नेतृवाखाली (Pimpri-Chinchwad rally) 14 ऑगस्ट फाळणी स्मृतिदिनानिमित्त शेकडो महिला कार्यकर्त्यांनी आज शाहूनगर, चिंचवड परिसरात मूक मिरवणूक काढली.

 

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अगणित,अनामिक हुतात्मे आणि फाळणीच्या दुर्दैवी हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप कुटुंबांना आदरांजली वाहण्यासाठी ही मूक मिरवणूक काढण्यात आली आहे, असे सुप्रियाताई चांदगुडे यांनी सांगितले.

 

Pimpri News: कामगार मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करून कुटुंबियांना अर्थसहाय्य द्या, कष्टकरी संघर्ष महासंघाची मागणी

यावेळी बापू शिणकर (मंडल अध्यक्ष),केशव घोळवे (मा. उपमहापौर पिंपरी चिंचवड शहर),सौ सुप्रियाताई चांदगुडे (भाजपा उपाध्यक्षा पि.चिं. शहर), संदीप थोरात,संदीप चव्हाण, ज्येष्ठ नागरिक,जाधव सर (ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष),राजेश्वर जंजाळे (अधीक्षक सीमा शुल्क भारत सरकार), (Pimpri-Chinchwad rally) अजित भालेराव, बाळासाहेब जगताप, भगवान मुळे,दिपाली धानोरकर,अश्विनी तोरखडे,अशा मेटांगणे,सप्ना चव्हाण,दिपाली करंजकर, स्वाती शहाणे,डॉ.वैदेही जंजाळे,स्वाती गायकवाड,रत्नमाला कदम यांच्या सोबत सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.