Pune: महाराष्ट्रात दोन मुख्यमंत्री, एक ‘मातोश्री’त, दुसरे राज्यभर फिरतायेत, चंद्रकांत पाटील यांचा हल्लाबोल

bjp president chandrakant patil slams on cm uddhav thackeray and ncp chief sharad pawar मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मुलाखत निव्वळ मॅच फिक्सिंग आहे. संजय राऊत प्रश्न विचारणार आणि त्याला मुख्यमंत्री उत्तरे देणार, राऊत हे स्तुतीपाठक आहेत. त्यांनी मुलाखत घेण्याऐवजी इतरांनी घ्यावी

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती भयंकर असून सध्या दोन मुख्यमंत्री आहेत. एक मातोश्रीत बसून राज्य चालवतात. तर, दुसरे महाराष्ट्रभर फिरत आहेत, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

पुण्यात रविवारी पाटील पत्रकारांशी बोलत होते. ‘कोंबडं कितीही झाकून ठेवलं तरी सूर्य उगवल्याशिवाय राहत नाही’, विरोधी पक्षनेत्याच्या प्रवासावर तुम्ही मर्यादा आणू शकत नाही. त्यांच्या आढावा बैठकांवरच तुम्ही मर्यादा आणू शकता.

मात्र, राज्यभर दौरे करताना विरोधी पक्षनेते जे बोलायचे ते बोलणारच, असेही पाटील यांनी ठणकावून सांगितले. ऑपरेशन लोटस नावाचा कोणताही विचार नाही. उलट या तीन पक्षांचा एकमेकांवरच विश्वास नाही. पुण्यात गंभीर परिस्थिती असून चार महिन्यानंतर का होईना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला पाहिजे.

त्यासाठी विरोधी आमदारांनाही बैठकीला बोलवावे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात यावे. अजित पवार यांना अपयशी ठरवल्याचे दाखविण्यात येत आहे. तर, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मुलाखत निव्वळ मॅच फिक्सिंग आहे.

संजय राऊत प्रश्न विचारणार आणि त्याला मुख्यमंत्री उत्तरे देणार, राऊत हे स्तुतीपाठक आहेत. त्यांनी मुलाखत घेण्याऐवजी इतरांनी घ्यावी, असे आवाहनही पाटील यांनी केले.

दरम्यान, पुणे शहरात कोरोनाचे संकट अतिशय गंभीर झाले आहे. रोज सातत्याने 1700 ते 1800 रुग्ण वाढत आहेत. जास्त प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यात येत असल्याने रुग्ण वाढल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या 1-1 बेडससाठी हॉस्पिटलसमोर रांगा लागलेल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.