BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ भाजप नगरसेविकेचे टाकीवर जाऊन आंदोलन 

एमपीसी न्यूज – पिंपरी, संत तुकारामनगर येथील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप करत भाजप नगरसेविका सुजाता पालांडे यांनी आज (सोमवारी) नेहरुनगर येथील पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केले.

यावेळी स्वीकृत नगरसेवक माऊली थोरात यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहाराला गुरुवारपासून दररोज पाणीपुरवठा सुरु केला असून पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने पाणी वितरणामध्ये अडचण येत असून उंचावरील भागात पाणी जाण्यास अडचणी येत आहेत.

पिंपरी, संत तुकारामनगर परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप करत पालांडे यांनी आज नेहरुनगर येथील पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3