Pune News : भाजपा अनुसूचित जाती मोर्चाकडून फुले वाड्यावर संविधान वाचन करत हुतात्म्यांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज : संविधान हे उपेक्षित, सर्वसामान्य माणसाला अतिशय मोलाचे आहे. त्याचे वाचन, अभ्यास आज समाजाल मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. त्यामुळे केवळ संविधान दिवसापूरता वाचन कार्यक्रम न ठेवता तो वर्षभर केला पाहीजे, असे मत आमदार सुनील कांबळे यांनी व्यक्त केले.

26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त पुणे शहर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने संविधान वाचन व 26/11 शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्याचा एकत्रित कार्यक्रम फुले वाड्यावर पार पडला त्यावेळी बोलत होते.

या कार्यक्रम प्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी 26/11 अतिरेकी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी नगरसेविका आरती कोंढरे, नगरसेविका वर्षा साठे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शहराध्यक्ष भीमराव साठे यांनी केले तर आभार प्रदर्शन अ‍ॅड.महेश सकट यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.