Mumbai : भाजप-शिवसेना महायुतीची संयुक्त पत्राद्वारे घोषणा

एमपीसी न्यूज – भाजप-शिवसेना, रासप, आरपीआय, शिवसंग्राम आणि रयत क्रांती संघटनेच्या महायुतीची घोषणा आज (सोमवारी) झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या स्वाक्षरीने संयुक्त पत्राद्वारे महायुतीची घोषणा करण्यात आली आहे.  

जागा वाटप मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे. कोण कोणती जागा लढविणार आहेत. मित्र पक्षांना किती जागा दिल्या आहेत. त्याची कोणतीही माहिती पत्रात दिली नाही. बंडाळी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांनी दक्षता घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.