Pune : राज ठाकरे कोथरूडमध्ये दाखल झाल्याने भाजपला धडकी

चंद्रकांत पाटील यांचा पराभव करणारच असल्याचा राष्ट्रवादीचा निर्धार

एमपीसी न्यूज – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोथरूडमधील उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी युवकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. राज यांची उपस्थिती भाजपला धडकी भरविणारीच आहे. राज यांची उद्या (बुधवार) पुण्यात सभा होणार आहे. त्यासाठी ते आज पुण्यात मुक्कामी आले.

आधीच पाटील यांच्या उमेदवारीला भाजपमधूनच विरोध आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पराभव करणारच असल्याचा निर्धार राष्ट्रवादीचा राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण यांनी केला. ज्या मतदारसंघात मनसेचे उमेदवार नाहीत. त्या मतदारसंघात मनसेने आमच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची मागणी चव्हाण यांनी केली. खडकवासला आणि पर्वती मतदारसंघांत मनसे पाठिंबा देणार का? याकडे लक्ष लागले आहे. प्रवक्ते अंकुश काकडे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2
You might also like