Chinchwad : भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी चिंचवडमधून विधानसभेची निवडणूक लढवावी

भाजप नगरसेवक तुषार कामठे यांची  विनंती 

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आगामी विधानससभेची निवडणूक चिंचवड मतदारसंघातून लढवावी, अशी विनंती भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी त्यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.  हा मतदारसंघ भाजपच्या विजयासाठी अनुकूल आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

प्रदेशाध्यक्ष पाटील पिंपरी महापालिकेत आले होते. त्यावेळी कामठे यांनी पाटील यांना पत्र देऊन चिंचवडमधून निवडणूक लढविण्याची मागणी केली आहे. आपल्या पारदर्शक, अभ्यासू, अष्टपैलू नेतृत्त्वामुळे अनेक कार्यकर्त्यांची मागणी आहे. आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. आपण या मतदार संघाचे लोकप्रतिधी झाल्यास शहराला आपल्यासारखे नेतृत्त्व लाभेल आणि ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असेल.

आपण या शहराचे नेतृत्त्व केल्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता येईल. आपल्या दूरदृष्टीमुळे पिंपरी-चिंचवड शहर वेगाने विकसित होईल. विशेष बाब म्हणजे, शहरात गटातटाचे राजकारण होणार नाही. पिंपरी-चिंचवड शहर भाजपमध्ये जी सुंदोपसुंदी चालू आहे. ती संपेल. सर्व काही अलबेल होईल.

आपल्या नेतृत्त्वामुळे भाजपमधील निष्ठावंत गटाची नाराजी दूर होईल. आमच्यासारखे नव्याने पक्षामध्ये आलेले. परंतु, राजकीय सुरूवात भाजपमधून झालेले. संघटनेबद्दल प्रेम असणाऱ्या नगरसेवकांना आपल्या नेतृत्त्वामुळे बळ मिळेल. पक्षाचा विस्तार वेगाने वाढेल. आपण चिंचवड मतदार संघातून प्रतिनिधीत्व करावे, ही माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांची मागणी आहे. हा मतदारसंघ भाजपच्या विजयासाठी अनुकूल आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी आणलेल्या विकासाच्या गंगेमुळे आपण मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघातून निवडून याल, असे नगरसेवक कामठे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.