Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष बारामतीत,लोकसभा जिंकण्याची रणनीती आखणार

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येत्या 6 सप्टेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येणार आहेत.2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचा हा दौरा असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. बावनकुळे येत्या पाच सप्टेंबर रोजी बारामती मुक्कामाला येथील आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी बारामतीतील वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे 6 सप्टेंबर रोजी सकाळी सातपासून संध्याकाळी सातपर्यंत बारामती शहर आणि तालुक्यातील बारा कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत.यामध्ये ते काही पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतील तर काही ठिकाणी भाजपच्या नवीन शाखांचे उद्घाटन करणार आहेत.त्यानंतर शेवटी एका पत्रकार परिषदेचे देखील आयोजन करण्यात आले आहे.चंद्रशेखर बावनकुळे हे बारामती तालुक्यातील माळेगाव, काठेवाडी आणि बारामती शहर या ठिकाणी भेट देणार आहेत.

दरम्यान, आगामी काही दिवसांत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा देखील बारामती दौरा होणार आहे. त्यांच्या या दौऱ्याची आखणी करण्याच्या दृष्टीने देखील बावनकुळे यांचा बारामती दौरा उपयुक्त ठरणार आहे.भाजपने नेहमीच बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र आजवर त्यांना या मतदारसंघावर झेंडा फडकवण्यात अपयश आले आहे.त्यामुळे आता नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बारामती लोकसभा मतदारसंघासाठी नवीन रणनीती काय आखतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.