Chandrakant Patil : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजपमध्ये एकजूट, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांची घेतली भेट

एमपीसी न्यूज –  पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांची भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरीतून भाजपचे जास्तीत – जास्त नगरसेवक निवडणून आणण्याचा शब्द प्रदेशाध्यक्षांना दिला. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपा युतीचे सरकार आल्याबद्दल अभिनंदन केले. महापालिका निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा केली.

प्रदेश सचिव अमित गोरखे, शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, पिंपरी प्रभारी सदाशिव खाडे, सह प्रभारी अनुप मोरे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, भाजपा उत्तर भारतीय आघाडीचे राजेश पिल्ले, भाजपा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस राजू दुर्गे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, केशव घोळवे, माजी नगरसेवक विजय शिंदे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, जयश्री गावडे,  वसंत गावडे, भाजपा पदाधिकारी अतुल इनामदार, राजेंद्र बाबर, गणेश ढाकणे आदी उपस्थित होते.

 

Pimpri News: अतिवृष्टीचा इशारा! शहरातील सर्व शाळांना आज, उद्या सुट्टी

 

चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी एकत्र असत. त्या तुलनेत पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, नगरसेवक एकत्र नव्हते. त्याला कारणही तसेच आहे. मागीलवेळी पिंपरीत शिवसेनेचा आमदार होता. तर, आता राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी, नगरसेवक एकत्र येत नसत. पिंपरी भाजपला गॉडफादर कोण नव्हता. त्यामुळे काही पदाधिकारी चिंचवडच्या आमदारांकडे तर काही पदाधिकारी भोसरीच्या आमदारांकडे जात असत.

 

Crime News : गुंतवणुकीचे आमिष दाखवत डॉक्टरची 35 लाख रुपयांची फसवणूक

 

 

आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पिंपरीतील पदाधिकारी, माजी नगरसेवक एकत्र आले. त्यांनी  मुंबईला जात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. पिंपरी विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष द्यावे. आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत-जास्त नगरसेवक भाजपचे निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 2024 मध्ये पिंपरीचा आमदारही भाजपचा असेल, असा शब्द पदाधिका-यांनी प्रदेशाध्यक्षांना दिला.

पिंपरीचे भाजप प्रभारी सदाशिव खाडे म्हणाले, ”राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली. त्यामुळे शहरातील पदाधिका-यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादांची सदिच्छा भेट घेतली”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.